किआ मोटर्सची नवीन फास्टबॅक सेडान कार सादर

(Source)

किआ मोटर्सने आपली लोकप्रिय सेडान कार किआ के5 वरील पडदा हटवला आहे. पुढील वर्षी या कारची विक्री सुरू होईल. या नवीन के5 कारमध्ये नवीन डिझाईन, कटिंग-इज टेक्नोलॉजी आणि नवीन इंजिन पर्याय देखील मिळेल.

के5 ची पुढील बाजू अधिक शानदार आहे. याच्या ग्रिलमध्ये एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आलेले आहेत. मागील जनरेशनच्या तुलनेत नवीन मॉडेल अधिक लांब व रुंद आहे. कारची उंची 20 एमएमने कमी करण्यात आलेली आहे. कारची लांबी 4,905 एमएम, रुंदी 1,860 एमएम  आणि व्हिलबेस 2,850 एमएम आहे.

(Source)

के5 सेडान कारमध्ये 16,17 आणि 18 इंच पर्यायामध्ये मशीन-कट एल्युमिनियम एलॉय व्हिल देण्यात आलेले आहेत. याशिवाय के5 जीटी व्हर्जनमध्ये खास डिझाईनमध्ये 19 इंच एलॉय व्हिल पर्याय देखील मिळेल. तसेच यात फ्रंट आण रिअरला एग्रेसिव्ह बम्पर्स मिळेल.

या कारचे इंटेरिअर देखील खास आहे. यात 10.25 इंच टचस्क्रीन पर्यायासोबतच किआचे नवीन 12.3 इंच डिजिट इंस्ट्रुमेंटल क्लस्टर देण्यात आलेले आहे. याशिवाय यात 8.0 इंचचा हेडअप डिस्प्ले देखील मिळेल. म्यूझिकसाठी यात 12 स्पिकर BOSE साउंड-ऑडिओ सिस्टम, मूडलाईटिंग सिस्टम आणि वायरले फोन चार्जिंग पर्याय देखील मिळेल. किआ के5 मध्ये पहिल्याच ऑल व्हिल ड्राईव्ह सिस्टम देण्यात आलेली आहे.

(Source)

के5 सेडान कार गॅसोलिन इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. उत्तर अमेरिका आणि कोरियातील ग्राहकांना 1.6 लिटर T-GDi इंजिन मिळेल. हे इंजिन 5500 rmp वर 180 ps पॉवर आणि 265 टॉर्क जनरेट करते.

याशिवाय ही कार 2 लिटर MPI इंजिन (152 PS, 192 NM),  2 लिटर इंजिनसोबत continuously-variable valve lift (CVVL) technology (160 ps, 196 NM) आणि 2.5 लिटर GDi इंजिन (194 PS, 246 NM) पर्यायामध्ये उपलब्ध आहे. हे सर्व इंजिन 6 अथवा 8 स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशननी सुसज्ज आहेत.

Leave a Comment