मुलगी बनून मुलाने उद्योगपतीला घातला 50 लाखांना गंडा

(Source)

राजस्थानच्या जोधपूर येथे सोशल मीडियावर संजना नावाच्या मुलीचा आईडी बनवून एका उद्योगपतीला फसवल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आवाजात गप्पा मारून उद्योगपतीला 50 लाखांना फसवणाऱ्या युवकाला जोधपूर पोलिसांनी अटक केले आहे.

जोधपूर एसीपी नीरज शर्मा यांनी सांगितले की, सिद्धार्थ पटेलने संजना नावाने फेसबुकवर बनावट आयडी बनवले होते. त्याने जोधपूरच्या एका उद्योगपतीशी मैत्री केली व मेसेंजर अॅपवर चॅट करू लागला.

त्यानंतर हळहळू व्हॉट्सअ‍ॅप देखील बोलणे होऊ लागले. मोबाईलवर बोलताना तो मुलीच्या आवाजात बोलू लागला. त्यानंतर तोच सिद्धार्थ मुलीचा भाऊ बनून जोधपूरला आला आणि त्याने उद्योगपतीची भेट घेतली.

सिद्धार्थने मुलीचा भाऊ बनून उद्योगपती रवी इनानियाची 3-4 वेळा भेट घेतली. संजना आजारी असल्याचे कारण सांगत त्याने अनेकवेळा आजीच्या खात्यात 3 लाख रुपये टाकण्यास सांगितले.

तसेच भूत-प्रेत, तांत्रिक विद्या करण्यासाठी मध्य प्रदेशच्या अनेक देवळात घेऊन गेला व तेथे लाखो रुपये खर्च करण्यास सांगितले. त्यानंतर सिद्धार्थ पटेलने लग्नाचा देखील प्रस्ताव ठेवला व रवी इनानियाने तो मान्य देखील केला. सिद्धार्थ वेगवेगळ्या नंबरवरून संजनाचे वडील, सावत्र आई, आत्या बनून रवीशी फोनवर बोलायचा.

सिद्धार्थने मागील अनेक वर्षात रवीला लाखो रुपयांना फसवले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी युवक सिद्धार्थ एवढा हुशार चोर आहे की, तो मोठमोठ्या नेत्यांचे देखील आवाज काढू शकतो. पोलिसांना संशय आहे की, त्याने अशाप्रकारे अनेकांना फसवले असेल. सध्या पोलीस तपास करत आहेत.

Leave a Comment