असे आहेत ‘स्ट्रीट डान्सर’मधील कलाकारांचे लूक


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा दिग्दर्शित आणि अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर अभिनीत ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ हा चित्रपट येत आहे. ‘एबीसीडी’ सिरीजचा हा तिसरा भाग असून लवकरच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. त्यापूर्वी चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक रिलीज करण्यात आले आहेत.


सोशल मीडियावर वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांचे फर्स्ट लूक शेअर करण्यात आले आहेत. त्यांच्या लूकवरून या चित्रपटात डान्सची जबरदस्त स्पर्धा रंगणार असल्याचा अंदाज येतो. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट २५ डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे.

Leave a Comment