अंटार्कटिकामध्ये 150 जागांसाठी नोकर भरती, वर्षाला एवढ्या कोटींचे पॅकेज

(Source)

बर्फाच्छादित प्रदेशात नोकरी, वर्षाला 1.8 कोटी रुपयांचे पॅकेज आणि वरून राहणे-खाणे फ्री. अशा खास नोकरीची जाहिरात ऑस्ट्रेलिया सरकारने दिली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना अंटार्कटिकाच्या रिसर्च स्टेशनमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अंटार्कटिकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या रिसर्च स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी 150 जणांची गरज आहे. यामध्ये डॉक्टर, आयटी ऑफिसर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटरसह अनेक नोकऱ्या आहेत.

या रिसर्च स्टेशनमध्ये काम करण्यासाठी टॉप शेफ जेवण बनवतील. येथे राहणाऱ्या लोकांना नवीन स्किल देखील शिकण्यास मिळेल.

डॉक्टरला वर्षाला 1.4 कोटी रुपये पगार मिळेल. आयटी ऑफिसरला 52 लाख रुपये पगार देण्यात येईल. येथे काम करणाऱ्याला पगाराच्या व्यतरिक्त 43 लाख रुपयांचा अतिरिक्त भत्ता देखील दिला जाईल. म्हणजेच एकूण पगार 1.8 कोटी रुपये असेल.

antarctica.gov.au या वेबसाईटवर जाऊन इच्छूक उमेदवार अधिक माहिती घेऊ शकतात. ऑस्ट्रेलियाच्या अंटार्कटिका विभागाचे म्हणणे आहे की, त्यांना प्रत्येक फील्डसाठी स्किल्ड कामगारांची गरज आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नोकरी 4 महिने ते 15 महिन्यांपर्यंत असू शकते. नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची सायकोलॉजिक्ल आणि मेडिकल सुटेबिलिटी टेस्ट देखील केली जाईल.

Leave a Comment