सोशल मीडियात व्हायरल इराचा बोल्ड अवतार


मागील दोन वर्षांमध्ये अनेक स्टार किड्सने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले, तर अनेक स्टार किड्स पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच पदार्पण केलेल्या अनेक स्टार किड्सच्या पदरी यश तर काहींच्या पदरी यश आले आहे. त्याचबरोबर काही स्टार किड्स या क्षेत्रापासून लांब असले तरी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत असतात.


या सर्वांमध्ये सर्वाधिक आमिर खानची मुलगी इराची चर्चा होत असते. इरा खान पदार्पणापूर्वीच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. इरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याचबरोबर ती आपले हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यातील तिचे फोटो बऱ्याच प्रमाणात व्हायरल देखील होत असतात.


इराने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. बॅकलेस गाऊनमध्ये इराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. इराने केलेल्या फोटोशूटमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. इराने नुकतेच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पडद्यावर झळकण्यापेक्षा पडद्यामागे राहून काम करणे मला आवडते, असे इराने एका मुलाखतीत म्हटले होते. आपल्या बोल्ड फोटोंमुळे इरा काही वेळा ट्रोलसुद्धा झाली आहे.

Leave a Comment