2019 मध्ये या 10 प्रसिद्ध भारतीयांनी घेतला जगाचा निरोप

(Source)

वर्ष 2019 अनेक चांगल्या-वाईट अनुभवासह सपंण्याच्या मार्गावर आहे. या वर्षात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या तर अनेक दुखःद घटनांचा देखील अनुभव आला. अनेक प्रसिद्ध भारतीय व्यक्तींचे यावर्षी निधन झाले. या व्यक्तींविषयी जाणून घेऊया.

(Source)

राजकुमार बडजात्या –

21 फेब्रुवारी 2019 ला हार्ट हटॅकने प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन झाले. त्यांनी हम आपके है कौन, विवाह, हम साथ साथ है, प्रेम रतन धन पायो यासारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली.

(Source)

मनोहर पर्रिकर –

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च 2019 ला निधन झाले. पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते.

(Source)

शीला दीक्षित –

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे दीर्घ आजाराने 20 जुलै 2019 ला निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या.

(Source)

विद्या सिन्हा –

अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे 15 ऑगस्ट 2019 निधन झाले. त्यांनी रजनीगंधा, छोटी सी बात, पती-पत्नी और वो सारख्या हिट चित्रपटात काम केले होते.

(Source)

अरूण जेटली –

भाजपचे वरिष्ठ नेते अरूण जेटली यांचे दीर्घ आजाराने 24 ऑगस्ट 2019 निधन झाले.

(Source)

सुषमा स्वराज –

माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी याच वर्षी 6 ऑगस्टला अखेरचा श्वास घेतला. लोकांची मदत करण्यासाठी सुषमा स्वराज या लोकप्रिय होत्या.

(Source)

विजू खोटे –

शोले चित्रपटा कालिया ही भूमिका साकारणारे प्रसिद्ध कलाकार विजू खोटे यांचे 30 सप्टेंबर 2019 ला निधन झाले. त्यांनी 300 पेक्षा अधिक चित्रपट आणि टिव्ही कार्यक्रमात काम केले आहे.

(Source)

वीरू देवगन –

दीर्घकाळ आजाराने ग्रस्त असल्याने अजय देवगनचे वडील आणि प्रसिद्ध एक्शन डायरेक्टर वीरू देवगन यांचे 27 मे 2019 मुंबईत निधन झाले.

(Source)

गिरीश कर्नाड –

दिग्गज अभिनेते व लेखक गिरीश कर्नाड मल्टीपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोमने ग्रसित होते. याचवर्षी 10 जूनला त्यांचे निधन झाले.

(Source)

वेणू माधव –

तेलगू चित्रपटातील प्रसिद्ध कॉमेडियन वेणू माधव यांनी 22 सप्टेंबरला अखेरचा श्वास घेतला. ते लिव्हर आणि किडनीच्या आजाराने त्रस्त होते.

Leave a Comment