3600 वर्षांपुर्वी दारू पिण्यासाठी वापरण्यात येणारा मातीचा कप सापडला

(Source)

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये एका संग्रहालयात 3600 वर्ष जुना विना हँडलचा एक डिस्पोजल कप प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे. म्यूझियमने दावा केला आहे की, मिनोअन सभ्यतेच्या काळात ग्रीसच्या क्रेते द्वीपावर चिकन मातीने बनलेले कप वापरले जात होते. या कपाची निर्मिती 1700 ते 1600 ईसा पुर्व मध्ये झालेले आहे. तर ही सभ्यता 2700 ते 1450 ईसा पुर्वपर्यंत अस्तित्वात होती.

पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमने दावा केला आहे की, हजारो वर्षांपुर्वी दारू पिण्यासाठी मातीच्या कपाचा वापर केला जात असे. हे कप वापरून फेकून देण्यात येत असे. हा शोध सांगतो की, डिस्पोजल टेक्निक आधुनिक युगातील नाही. सांगण्यात येते की, जगात 1990 च्या दशकापासून एअरपोर्ट, हॉटेल आणि विमानात डिस्पोजलचा वापर वाढला

ब्रिटिश म्यूझियमच्या क्यूरेटर ज्युलिया फर्ले यांनी सांगितले की, तेव्हाचा मोठा वर्ग मोठ-मोठ्या पार्ट्यांचे आयोजन सणांच्या वेळी करत असे. यावेळी डिस्पोजल कपाचा वापर केला जात असे. पार्टीनंतर फेकण्यात आलेल्या डिस्पोजल कपावरूनच आयोजक आपल्या संपत्तीचा दिखावा करू शकत असे. पार्टीमध्ये मोठ्या संख्येने लोक येत असे, मात्र कोणीही भांडी धुण्यास तयार नसे. त्यामुळे डिस्पोजल कपाचा वापर केला जात असे.

Leave a Comment