पायाला बँडेज बांधत 11 वर्षीय धावपटूने जिंकले 3 सुवर्णपदक

(Source)

जर एखादी गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल तर कोणतीच गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही. अनेक अडचणी आल्या तरी देखील तुम्ही मेहनतीने ती गोष्ट मिळवताच. याचेच एक जिंवत उदाहरण ठरले आहे 11 वर्षांची फिलिपीन्सची एक धावपटू.

फिलिपीन्सची 11 वर्षीय धावपटू रिया बुलोस सध्या बुट नसताना देखील शर्यत जिंकल्याने इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. बुट नसल्याने रियाने आपल्या पायाला बँडेज बांधले व 400 मीटर, 800 मीटर आणि 1500 मीटर अशा तिन्ही शर्यतींमध्ये सुर्वणपदक पटकावले. विशेष म्हणजे तिने आपल्या बँडेजवर प्रसिद्ध बुट कंपनी नाइकीचे नाव व लोगो काढला होता.

New design of spike shoesMade in PhilippinesNIKECongratulations RHEA BULLOS of Balasan 3GOLDS400m dash ELem Girls800m run Elem Girls1500m run Elem Girls

Posted by Predirick B. Valenzuela on Monday, December 9, 2019

रियाचे प्रशिक्षक म्हणाले की, ती जिंकली याचा मला अभिमान आहे. तिने खूप मेहनत घेतली. त्यांच्याकडे प्रशिक्षणावेळी बुट नसल्याने ते वैतागतात.

या मुलीची कथा समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला मदत करण्यासाठी हात पुढे केले. काहींनी नाइकी कंपनीला तिला मदत करण्यास देखील सांगितले.

(Source)

एका युजरने रियाला बुट घेण्यास देखील मदत केली.

Leave a Comment