राममंदिरासाठी एक वीट देण्याचे आदित्यनाथांचे आवाहन


अयोध्येतील रामजन्मभूमी वर राममंदिर उभारणी बाबत अनुकूल निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक घरातून एक वीट मंदिरासाठी देण्याचे आवाहन केले आहे. झारखंड विधानसभा निवडणुक प्रचार सभेत ते बोलत होते.

आदित्यनाथ म्हणाले गेली ५०० वर्षे लाखो हिंदुनी त्यांचे जीवन याच कामासाठी समर्पित केले आहे. हे मंदिर केवळ मंदिर नसेल तर ते राष्ट्रीय मंदिर असेल आणि ते राम जन्मभूमीवर बनविले जाईल. हे मंदिर देशाचा आत्मा असेल आणि जगभर ते लोकशाही आणि न्यायपालिका भारतात किती मजबूत आहे याचे दर्शन घडवेल.

विशेष म्हणजे झारखंड मध्ये प्रचार सभेत बोलताना केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनीही चार महिन्यात गगनाला गवसणी घालणारे राम मंदिर उभे राहील असे जाहीर केले आहे. ९ नोव्हेंबर रोजी या दीर्घ काळ चाललेल्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना रामजन्म भूमी न्यासाकडे ही विवादित जमीन देण्याचा तसेच वक्फ बोर्डला जवळच ५ एकर वेगळी जमीन देण्याचा निकाल दिला आहे. या निकालाचा पुनर्विचार करण्यासंदर्भात याचीका दाखल केली गेली आहे.

Leave a Comment