या विमानतळावर विमान खेचण्यासाठी होतोय लोम्बार्गिनीचा वापर


तुम्ही कधी इटलीतील बोलोग्ना विमानतळावर उतरणार असलात तर तुमचे विमान पार्किंग जागेत नेण्यासाठी सुपरकार लोम्बार्गिनीच्या हुरकेनचे नवे फॉलो मी मॉडेल दिसले तर नवल वाटून घेऊ नका. एरवी रस्त्यांवर फार्राट वेगाने धावणारया लोम्बार्गिनीच्या सुपरकार अनेकदा पहिल्या असतील तर विमानतळावर विमान खेचून नेणारी ही सुपरकार तुम्हाला फक्त बोलोग्ना विमानतळावरच पाहता येईल.

लोम्बार्गिनी हुरकेन फॉलो मी सुपरकार रनवे वरून विमानाला पार्किंग स्पेस मध्ये तसेच पार्किंग स्पेस मधून विमान रनवे वर खेचून नेण्यासाठी वापरली जात असून विमानाचा पायलट आणि कारचा चालक दोघांसाठी हा रोमांचकारी अनुभव आहे. फॉलो मी ला ५.२ लिटरचे नॅचरली इम्पिरेटेड व्ही १० इंजिन दिले गेले असून ऑरेंज बॉडी ग्राफिक्स दिले आहेत. कारचे छत, दोन्ही दरवाजे व पुढे मागे इंडेक्सवर इटलीचा ध्वज शिवाय छतावर ऑरेंज लाईटबार आहे. विमानतळाच्या कंट्रोलशी नेहमी कनेक्ट राहणारा रेडीओ आणि मस्त स्टीकर्स कारवर आहेत.

Leave a Comment