तापसीने फोटो शेअर करत जाहिर केली ‘थप्पड’ची रिलीज डेट


यावर्षी मिशन मंगल’, ‘सांड कि आँख’ यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नु झळकली होती. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या आगामी ‘थप्पड’ या चित्रपटात आता ती झळकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाची रिलीज डेट आता जाहिर करत तापसीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.


तापसी अनुभव सिन्हा यांच्या ‘मुल्क’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा त्यांच्यासोबत एकत्रित आली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २८ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. हा चित्रपट महिलांवर आधारित असणार आहे. यामध्ये तापसीची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज अंतर्गत केली जाणार आहे. तापसी या चित्रपटाबरोबरच महिला क्रिकेटर मिताली राज हिच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्येही झळकणार आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून तापसीने या बायोपिकबाबत माहिती दिली होती.

Leave a Comment