चांगल्या कामासाठी ‘प्रेरणा’ नव्हे तर योग्य ‘नियोजना’ची गरज

(Source)

अनेकदा आपण मोठी स्वप्न बघतो, एखादे काम करण्याचा प्रयत्न करतो, मात्र ते काम योग्यरित्या होत नाही. कारण आपण अनेक गोष्टी करताना टाळाटाळ करतो. सकाळी उठण्यापासून ते जिमला न जाण्यासाठी आपल्याकडे अनेक कारणे असतात.

तुम्हाला ज्या मिळावयाच्या आहेत, त्यासाठी मेहनत न करणे, संघर्ष न करणे यामुळे प्रगती होत नाही. तुम्ही त्या गोष्टीचे आव्हान स्विकारत नाही. उलट आपण ती कामे टाळण्यासाठी कारणे शोधत असतो व सतत फोन वापरणे, कॉफी ब्रेक घेणे अशा गोष्टी करत असतो.

तुम्हाला कधी काम करताना असे वाटले आहे का की, तुम्ही मोटिव्हेटेड (प्रेरित) नाही ? मात्र तुम्हाला तुमचे काम व्यवस्थित करण्यासाठी मोटिव्हेशनची नाही तर एका सिस्टमची (नियोजन) गरज आहे. जर तुम्ही काम व्यवस्थित सिस्टम फॉलो करत कराल तर तुम्हाला हवे असलेले परिणाम देखील नक्कीच मिळतील.

(Source)

बौद्धिक ताकदीचा वापर करा –

अनेकदा आपण आपल्या डोक्यात आलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जाणूनबुजून त्या गोष्टीकडे लक्ष न देता अधिक वेळ विचार करत राहतो. त्यामुळे पुस्तक वाचण्यास सुरूवात करा. ज्यामुळे चांगले विचार व मानसिक ताकदीचा योग्य प्रकारे वापर करण्यास मदत मिळेल.

(Source)

 

व्यायाम करा –

दररोज व्यायाम केल्याने तुमचा आत्मविश्वास कायम राहिल, तुम्ही दिवसभर न थकता सहज कामात लक्ष देऊ शकता.

(Source)

दैनंदिन कामची यादी करा –

दररोजच्या महत्त्वाच्या गोष्टींची यादी करा. रोज लिहा, वाचा. गरजेच्या नसलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. मित्र व कुटूंबाशी गप्पा मारा. आपल्या आजुबाजूच्या लोकांशी संपर्क असणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला आनंद मिळेल.

यादी बनवा व पालन करा –

ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, त्याची यादी बनवा. तुम्ही अनेक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न कराल, मात्र तुम्ही यादीप्रमाणे जाल, सिस्टमचे पालन कराल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे तुम्ही एक सिस्टम तयार करून त्याचे पालन करण्यास आजपासून नक्कीच सुरूवात करा. जेणेकरून तुम्ही कोणतीही गोष्ट न करण्यासाठी कारणे शोधणार नाहीत.

Leave a Comment