या मॉडेलच्या घरातून चोरीला गेले तब्बल 475 कोटींचे दागिने

(Source)

एका मॉडेल आणि टिव्ही पर्सनलिटीच्या घरातून तब्बल 475 कोटी रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना लंडनमध्ये घडली असून, चोरांनी मॉडेल तमारा एकलेस्टोनच्या घरातून केवळ 50 मिनिटात एवढे महागडे दागिने गायब केले.

तमारा ज्या घरात राहते, त्या घराची किंमत जवळपास 665 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याच घरातून हे महागडे दागिने चोरीला गेले आहेत. चोरांनी एक तासांपेक्षा कमी वेळेत एवढी मोठी चोरी केली. चोरीच्या घटनेच्या काही तासांपुर्वीच तमारा ख्रिसमस साजरा करण्यासाठी देशातून बाहेर जाण्यास निघाली होती.

लंडनच्या ज्या भागात तमाराचे घर आहे, तो प्रतिष्ठित भाग समजला जातो. येथे 24 तास पोलीस असते. याशिवाय चेकपॉइंट्स देखील आहेत. मात्र चोरांनी या सर्व सुरक्षा उपायांवर मात करत चोरी केली.

तमाराच्या 57 खोल्यांच्या या बंगल्यात 24 तास गार्ड्स असतात. 3 चोरांनी गार्डनच्या बाजूने घरात घुसून चोरी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Leave a Comment