महिलांवरील अत्याचारामुळे सोनाक्षी सिन्हा नाराज


महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे हिंदी सिनेसृष्टीत १० वर्षे पूर्ण करणारी सोनाक्षी सिन्हा नाराज आहे. एका प्रसार माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली की, कोणीच भारताची मुलगी बनू इच्छित नाही. त्याचबरोबर तिने निर्भया प्रकरणावरदेखील चर्चा केली. ती म्हणाली, वारंवार अशा घटना का घडत आहेत. सोनाक्षी सध्या सलमान खानसोबत आपल्या आगामी ‘दबंग 3’च्या प्रमोशनात व्यस्त आहे. सोनाक्षी देशात सतत होत असलेल्या बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणावर म्हणाली, अशा लोकांना काय वाटते हे माहित नाही, पण हे सर्व भयंकर आहे. ती म्हणाली, देशात कुठेही मुली सुरक्षित नाहीत.

अशीच स्थिती राहिली तर देशाची कोणीही मुलगी होणार नाही. सोनाक्षी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर म्हणाली की, काळ बदलत चालला आहे आणि आपल्या हक्कांसाठी ती प्रत्येक क्षेत्रात आवाज उठवत आहे. सोनाक्षीने हैदराबाद प्रकरणाबद्दलही नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, आजमितीस दिल्लीतील निर्भया प्रकरणाला सात वर्षे उलटली, पण अशा भयानक घटना अद्यापही घडत आहेत. ती म्हणाली, या घटनांविरोधात देशात पावले उचलली जात असले तरी देखील वारंवार अशा घटना का घडत आहेत.

Leave a Comment