पुढील वर्षाच्या या महिन्यात लाँच होणार स्कोडाची नवीन एसयूव्ही

(Source)

कार कंपनी स्कोडा लवकरच Skoda Karoq नावाची नवीन एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच करणार आहे. ही एसयूव्ही पुढील वर्षी एप्रिलमध्ये भारतीय रस्त्यावर धावताना दिसेल. सुरूवातीला ही एसयूव्ही केवळ पेट्रोल इंजिनमध्येच उपलब्ध असेल. भारतात ही एसयूव्ही पुर्ण बिल्ड यूनिटमध्ये (CBU) येईल. स्कोडाची ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही एमजी हेक्टर, जीप कंपस आणि ह्युंडाई टूसॉन सारख्या एसयूव्हींना टक्कर देईल.

(Source)

कॅरेक एसयूव्हीमध्ये अँड्राईड ऑटो आणि अपल कारप्ले सपोर्टसोबत टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम असेल. याशिवाय ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, लेदर अपहोल्स्ट्री सीट्स मिळतील. एसयूव्हीमध्ये कॅबिन ब्लॅक आणि बेज ब्लॅक या रंगात मिळेल.

(Source)

या कारच्या इंजिनबद्दल अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र हे पेट्रोल इंजिन असेल. या एसयूव्हीमध्ये 113 बीएचपी पॉवर आणि 175 एनएम टॉर्क जनरेट करणारे 1 लीटर इंजिन अथवा 148 बीएचपीची पॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करणारे 1.5 लीटर इंजिन मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही इंजिनसोबत ही एसयूव्ही उपलब्ध आहे. ग्राहकांच्या फीडबॅकनंतर बीएस6 वरील डिझेल इंजिन असणारी एसयूव्ही आणण्यात येईल.

दरम्यान, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये स्कोडा सिडेन कार Octavia RS 245 सादर करणार आहे.

Leave a Comment