प्रवीण दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता


नागपूर – विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची माळ भाजपकडून कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या शर्यतीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे सर्वात आधी नाव चर्चेत होते. पण, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. भाजपचे प्रदेश महामंत्री सुजितसिंह ठाकूर यांच्याही नावाची या यादीत जोरदार चर्चा होती. दरम्यान, सुजितसिंह ठाकूर यांची भाजपचे मुख्य प्रतोद म्हणून निवड झाली, तर उपनेतेपदी भाई गिरकर यांची निवड झाली.

पश्चिम महाराष्ट्राकडे चंद्रकांत पाटलांच्या रूपाने भाजपचे प्रदेशाध्यक्षपद तर, फडणवीस यांच्या रुपाने विदर्भाकडे विधानसभा विरोधी पक्षनेतेपद आहे. यात विधानपरिषदेचे विरोधी नेतेपद आता मुंबईकडे गेले आहे. या पदासाठी माजी मंत्री डॉ. रणजित पाटील, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, भाई गिरकर यांच्या नावाचीही चर्चा होती. पण आक्रमक व नवा चेहरा म्हणून दरेकर यांच्या नावाला पक्षात पसंती मिळाल्याचे कळते.

Leave a Comment