जीवरक्षक 21 औषधांच्या किंमतीत होणार 50 टक्क्यांची वाढ


मुंबई – मलेरिया, टीबीसह 21 औषधांच्या किंमतीमध्ये राष्‍ट्रीय औषध मूल्‍य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) तब्बल 50 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे ही औषधे खरेदी रुग्णांना आता महागात पडणार आहे. सरकारच्या जीवनावश्यक औषधांच्या यादीतील एनपीपीएने वाढवलेल्या औषधांची यादी आहे. एनपीपीएने संबंधित औषधांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 21 औषधांच्या किंमती एनपीपीएने 50 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. औषधाच्या किंमती ठरवण्याचे संपूर्ण अधिकार एनपीपीएला असतात.

रुग्णांना कमी किंमतीत औषधे उपलब्ध करून देण्यासाठी एनपीपीए औषधांचे दर ठरवत असते. परंतु, रुग्णांच्या खिशाला एनपीपीएलने केलेल्या दरवाढीमुळे कात्री लागणार आहे. औषधांची उत्पादन किंमत तसेच मूळ घटकद्रव्यांमध्ये वाढ झाल्याने औषध निर्मिती कंपन्यांनी औषधांच्या किंमतीत वाढ करावी, अशी मागणी एनपीपीएकडे केली होती. तसेच औषध उत्पादन परवडत नसल्याने बाजारामध्ये औषधांचा तुटवडा होऊ लागला होता. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यास रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागल्यामुळे औषधांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एनपीपीएने सांगितले आहे.

एनपीपीएच्या निर्णयानंतर ही औषध होणार महाग –
1. BCG Vaccine– टीबी तसेच कर्करोगावरील औषध
2. Benzathine benzylpenicillin– Antibiotic– बॅक्टीरियल संसर्गावरील उपचारासाठी
3. Chloroquine– मलेरियावरील उपचारासाठी
4. Dapsone– त्वचावरील उपचारासाठी
5. Furosemide – सूज, उच्च रक्तदाबावरील उपचारासाठी
6. Metronidazole- Antibiotic – संसर्गावरील उपचारासाठी
7. Pheniramine– एलर्जी
8. Prednisolone– steroid– lupus, ulcerative colitis – एलर्जीवरील उपचारासाठी.
9. Clofazimine– कुष्ठरोगावरील उपचारासाठी

नोव्हेंबर महिन्यात काही औषधांच्या किंमती वाढवणार असल्याची कल्पना निती आयोगाने दिली होती. एनपीपीएने वाढवलेल्या औषधांच्या किंमतीमध्ये ऍन्टिबायोटिक औषध, कुष्ठरोग, मलेरिया आणि टीबीच्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे.

Leave a Comment