अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांची ‘मी सावरकर’ टोप्या घालून निदर्शने


नागपूर – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून हे अधिवेशन शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या मुद्यांवरुन गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत सभागृहात मी सावरकर नावाच्या टोप्या घालून प्रवेश केला.

यावेळी राहुल गांधीनी माफी मागावी…उद्धव ठाकरे होश में आओ… इंदिरा गांधींच्या धिक्कार असो… अशा घोषणा सर्व आमदार विधानसभेबाहेर देत आहेत. पुढील सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात ऐन थंडीत वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भगव्या रंगाच्या ‘मी सावरकर’ लिहिलेल्या टोप्या घालून भाजपच्या सर्व आमदारांनी विधानभवनात प्रवेश केला. शिवसेनेला सावरकरांच्या मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव असून भाजप सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment