नेटवर्क नसतानाही जिओवरुन करता येणार कॉल

(Source)

भारतीय टेलिकॉम बाजारात 5जी नेटवर्क येण्याआधीच एक नवीन नेटवर्क सेवा आली आहे. ही सर्विस वॉईस ओव्हर वाय-फाय (VoWiFi) आहे. रिलायन्स जिओने या नवीन सर्विसचे टेस्टिंग सुरू केले आहे. याआधी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी ही सर्विस सुरू केली होती.

जिओने नाशिकमध्ये या फीचरची टेस्टिंग सुरू केली आहे. कंपनी सुरूवातीला मोजक्याच युजर्ससाठी ही सेवा सुरू करणार आहे.

काय आहे वाय-फाय कॉलिंग ?

वाय-फाय कॉलिंगला वॉईस ओव्हर वाय-फाय अथवा VoWiFi देखील म्हटले जाते. या फीचरमध्ये वाय-फायद्वारे तुम्ही होम वाय-फाय, पब्लिक वाय-फाय आणि वाय-फाय हॉट स्पॉटच्या मदतीने कॉलिंग करू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्या फोनमध्ये नेटवर्क नसेल तर तुम्ही कोणत्या वाय-फाय अथवा कोणाकडून हॉटस्पॉट घेऊन फोनवर आरामशीर गप्पा मारू शकता. या सेवेचा सर्वात मोठा फायदा रोमिंगचा होतो. कारण तुम्ही कोणत्याही वाय-फायद्वारे फ्रीमध्ये कॉल करू शकता.

एअरटेलने देखील काही दिवसांपुर्वीच ही सेवा सुरू केली होती. कंपनीने याला एअरटेल वाय-फाय कॉलिंग असे नाव दिले आहे. या सेवेद्वारे युजर्स मोफतमध्ये इंटरनेटद्वारे लोकांशी फोनवर बोलू शकतात.

सध्या सॅमसंगच्या गॅलेक्सी जे6, सॅमसंग ऑन 6, , सॅमसंग गॅलेक्सी एम30एस आणि गॅलेक्सी ए10एस मध्ये ही सेवा मिळते. तर शाओमीच्या पोको एफ1, रेडमी के20 आणि रेडमी के20 प्रो आणि वनप्लसच्या वनप्लस 7, वनप्लस 7 प्रो, वनप्लस 7टी, वनप्लस 7टी प्रो मध्ये Airtel Wi-Fi Calling सपोर्ट मिळत आहे.

Leave a Comment