स्ट्रिप क्लबमध्ये लाखोंची उधळपट्टी, सीईओला गमवावी लागली नोकरी

(Source)

अनेकदा कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांबरोबर डील करण्यासाठी अथवा त्यांच्याबरोबर बाहेर जेवणासाठी क्रेडिट कार्ड देत असते. मात्र याचा क्रेडिट कार्डचा वापर अनेकदा स्वखर्चासाठी, जेवणासाठी देखील केला जातो. मात्र एका आयटी कंपनीच्या सीईओला या क्रेडिट कार्डचा वापर खाण्या-पिण्यासाठी मर्यादेपलीकडे करणे चांगलेच महागात पडले आहे.

अमेरिकेतील स्टार्टअप कंपनीने आपल्या सीईओला लिमिट पेक्षा अधिक पैसे स्ट्रिप क्लबमध्ये उधळल्याने काढून टाकले आहे. टुर्वो कंपनीचे सीईओ इरिक गिलमोर यांच्यावर कंपनीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून स्ट्रिप क्लबमध्ये मनोरंजनासाठी तब्बल 75000 डॉलर (जवळपास 53 लाख रुपये) उधळल्याचा आरोप आहे.

रिपोर्टनुसार, हा खर्च त्याने मागील 3 वर्षात केलेला आहे. कंपनीच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याने क्रेडिट कार्ड खर्चाचा अहवाल तपासल्यानंतर हा प्रकार उघकीस आला. गिलमोरने कंपन्याच्या क्रेडिट कार्डवर 1 लाख 25 हजार डॉलर (जवळपास 89 लाख रुपये) पेक्षा अधिक पैशांची उधळपट्टी केली.

गिलमोरने देखील आपण एवढा खर्च केल्याचा आरोप मान्य केला आहे. मात्र त्यानेच कंपनीविरोधात त्याला काढून टाकण्यासंबंधित प्रक्रिया व्यवस्थित राबवली नसल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. सप्टेंबरमध्ये ही केस सेटल झाली.

या प्रकरणानंतर देखील गिलमोर सध्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये असून, ते कंपनीचे सर्वात मोठे शेअर होल्डर आहेत. गिलमोर यांनी 2014 मध्ये टुर्वो कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीचे बाजार मूल्य 435 मिलियन डॉलर असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment