केंद्र सरकार लाँच करणार व्हॉट्सअ‍ॅपसारखे चॅटिंग अ‍ॅप

(Source)

केंद्र सरकार सध्या एका मल्टीमीडिया मॅसेजिंग अ‍ॅपचे टेस्टिंग करत असून, हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामप्रमाणेच असेल. या अ‍ॅपचे कोड नाव GIMs म्हणजेच गर्व्हमेंट इंस्टेंट मॅसेजिंग सिस्टम आहे. या अ‍ॅपची टेस्टिंग सध्या ओडिसामध्ये सुरू असून, ट्रायल म्हणून याचा सर्वात प्रथम वापर नौदल करेल.

GIMs अ‍ॅपला नॅशनल इंफोर्मेशन सेंटर, केरळ युनिटने डिझाईन केले आहे. या अ‍ॅपचा वापर सरकारी कर्मचारी आणि सरकारी संस्था अधिकृत संवादासाठी करतील. याच वर्षी सप्टेंबरच्या सुरूवातीला या अ‍ॅपचे आयओएस व्हर्जन जारी करण्यात आले होते. हे व्हर्जन आयओएस 11 व त्यावरील व्हर्जनसाठी होते. सध्या अँड्राईड व्हर्जनवर काम सुरू आहे.

सांगण्यात येत आहे की, ओडिसा सरकारच्या फायनान्स डिपार्टेमेंटमध्ये पायलट प्रोजेक्ट अंतर्गत याचे टेस्टिंग सुरू आहे. सर्व कर्मचाऱ्यांना हे अ‍ॅप फोनमध्ये इंस्टॉल करण्यास सांगण्यात आलेले आहे.

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप सारख्या परदेशी अ‍ॅपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. GIMs अ‍ॅप देखील एंड-टू-एंड इंक्रिप्टेड असेल. मात्र हे अ‍ॅप केवळ खाजगी संवादासाठी असेल, ग्रुप चॅटिंगसाठी नाही.

 

Leave a Comment