8 वर्ष मातृ्त्वापासून वंच्छित असलेली ही महिला आज आहे ‘फर्टीलिटी मित्र’

(Source)

ओव्हेरियन कॅन्सर, मिसकॅरेज आणि आयव्हीएफ अयशस्वी झाल्यानंतर दिल्लीच्या गितांजली यांना 8 वर्ष इनफर्टीलिटीचा त्रास सहन करावा लागला. डॉक्टरांनी तर त्या कधीच आई बनू शकणार नाहीत, असे देखील सांगितले. मात्र त्यांनी हार मानली नाही व पुन्हा आयव्हीएफचा प्रयत्न केला व त्यात यश आले.

या नंतर गितांजली यांनी ठरवले की, इनफर्टीलिटीच्या समस्येमुळे त्रस्त जोडप्यांसाठी काहीतरी करायचे. यासाठी त्यांचे कर्नल पती आणि कुटूंबाने देखील प्रोत्साहन दिले. गितांजली यांनी 2 वर्ष रिसर्च करून 2015 मध्ये फर्टीलिटी दोस्त साइट बनवून काउंसिलिंग सुरू केले. आतापर्यंत त्यांनी देशभरातील 50 हजार जोडप्यांचे काउंसिलिंग केले आहे.

गीतांजली सांगतात की, लखनऊच्या एका जोडप्याने त्यांना इनफर्टिलिटीची समस्या सांगितली. आम्ही त्यांना आयव्हीएफ सेंटरमध्ये जाण्यास सांगितले. यावर त्या जोडप्याने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने त्यांना सेंटरजवळ पाहिले तर अडचण होईल. गीतांजली सांगतात की, आज देखील इनफर्टिलीटी एक सामाजिक निषिद्ध आहे. काही लोक ही गोष्ट लपवतात तर काही लोक यावरून बोलणी खातात.

त्या साइट, फेसबूक, ब्लॉग, व्हॉट्सअपद्वारे जोडप्यांना काउंसिलिंग करतात. आज दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू सारख्या शहरात काउंसिलिंग सेंटर सुरू आहेत. यामध्ये इनफर्टिलिटी सपोर्ट, हॅपिनेस, एडॉप्शन आणि प्री आयव्हीएफ प्रोग्राम चालवले जात आहेत. वेबसाईट बनवण्याआधी त्यांनी फेसबुकवर एक सिक्रेट ग्रुप बनवला. त्यावर 250 महिला जोडल्या गेल्या. या कामात क्लिनिकची मदत मिळते. तसेच कंपन्यांच्या सीएसआर फंडद्वारे देखील मदत मिळते.

जगभरात सध्या 3.3 कोटी जोडप्यांना इनफर्टिलिटी समस्येचा सामना करावा लागत आहे.

Leave a Comment