… आणि बँकेने चुकीने दुसऱ्याच खात्यात ट्रांसफर केले 262 कोटी रुपये

(Source)

एका बँकेने चुकीने एका महिलेच्या खात्यात तब्बल 262 कोटी रुपये ट्रांसफर केल्याची घटना घडली आहे. एवढी मोठी रक्कम खात्यात आल्याने महिला देखील दंग झाली. याविषयी तिने आपल्या पतीला देखील विचारले.

खात्यात चुकीने एवढी मोठी रक्कम जमा झाल्याची घटना अमेरिकेतील टेक्सास येथे घडली आहे. बँकेच्या एका चुकीमुळे 35 वर्षीय रुथ बॅलून एक दिवसासाठी कोट्याधीश झाल्या होत्या.

महिलेने एवढी मोठी रक्कम बँकेत बघताच लगेच लीगेसी टेक्सास बँकेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेची ऑनलाईन चॅट सर्विस बंद असल्याने संपर्क झाला नाही. दोन मुलांची आई असलेली रुथ म्हणाली की, मी असा विचार करत होते की, एवढी मोठी रक्कम कोणीतरी भेट दिली आहे.

महिलेने जेव्हा पती ब्रिआनला या घटनेबद्दल सांगितले तेव्हा तो ही काहीतरी घोट्याळासारखी घटना असल्याचे म्हटला. बँकेशी संपर्क साधल्यावर समजले की, ख्रिसमसच्या निमित्ताने आलेली ही रक्कम भेट नसून, बँकेची चूक आहे.

बँकेने सांगितले की, कर्मचाऱ्याने चुकीने दुसऱ्याच खात्यात रक्कम ट्रांसफर केली. बँकेने घटनेवर माफी मागितली व पैसे परत घेतले. महिलेने हे देखील मान्य केले की, एका क्षणासाठी त्यांनी हा पैसे कोठे खर्च करायचा याचा देखील विचार केला होता.

 

Leave a Comment