घरातून निघण्यापूर्वीच या अ‍ॅपद्वारे बुक करा पार्किंगची जागा

(Source)

शहरात कोठे जायचे असेल तर पार्किंग कोठे करायची हा विचार सर्वात प्रथम येतो. या समस्येतून सुटका करण्यासाठी वृहद चेन्नई महानगरपालिकेने (जीसीसी) ‘जीसीसी स्ट्रीट स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट’ मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. याद्वारे शहरात रिकामी पार्किंग जागा शोधता व बुकिंग करता येणार आहे.

जीसीसीने दोन संस्थेच्या मदतीने हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपमध्ये शहरातील 7667 पार्किंग स्लॉटची माहिती आहे. सध्या चेन्नईतील पॉडी बाजार, बसंत नगर, पुरासाइवल्कम आणि अन्नानगरमध्ये ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. पुढील तीन महिन्यात नवीन जागांचा यात समावेश करून 23 हजार स्लॉट या अ‍ॅपद्वारे बुक करता येतील.

रिकाम्या पार्किंगच्या माहितीसाठी 500 कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. यांची संख्या लवकरच 700 करण्यात येईल. अ‍ॅप एजेंसीचे संचालक तमिल अरासन म्हणाले की, कॅमेऱ्यांची लाईव्ह माहिती अपडेट होईल. जीसीसीचे 58 कर्मचारी पार्किंगचे शुल्क स्विकारतील. हे शुल्क सुरूवातीच्या 1 तासासाठी कारसाठी 20 रुपये व दुचाकीसाठी 5 रुपये असेल.

8 तासांपेक्षा अधिक वेळ वाहन उभे केल्यास दंड आकारला जाईल. या अ‍ॅपमध्ये शहरातील 10 हजार पार्किंग स्थळांची माहिती देण्यात येत आहे, जे शहरातील गल्लींमध्ये बनलेले आहेत.

 

Leave a Comment