उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी


नवी दिल्ली : भाजप आमदार कुलदीप सेंगरला संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आता १९ डिसेंबर रोजी शिक्षेवरील सुनावणी होणार आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने आज आपला निकाल सुनावला.

२०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून उन्नाव येथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या बलात्काराचा व अपहरणाचा भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर याच्यावर आरोप होता. हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लखनऊ येथील न्यायालयातून दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. या खटल्याची ५ ऑगस्टपासून दैनंदिन सुनावणी होत आहे. या प्रकरणी सेंगर व सहआरोपी शशी सिंग याच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, अपहरण, बलात्कार आदींशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Leave a Comment