हे आजोबा ठरले अंटार्कटिक मॅरोथॉन पुर्ण करणारे सर्वाधिक वयोवृद्ध धावपटू

(Source)

कॅनडाची अल्बर्टा राज्याची राजधानी एडमोंटन येथे राहणारे 84 वर्षीय रॉय स्वेनिंगसेन अंटार्कटिक आइस मॅरोथॉनमध्ये भाग घेणारे सर्वात वयस्करधावपटू ठरले आहेत. रॉय यांनी 11 तास, 41 मिनिटे आणि 58 सेंकदात मॅरोथॉन पुर्ण करत हा विक्रम केला.

अंटार्कटिक आइस मॅरोथॉनचे संचालक रिटर्ड डोनोवन हे रॉय यांचे कौतूक करताना म्हणाले की, हे खरच कौतूकास्पद आहे. यामुळे येणाऱ्या धावपटूंना नक्कीच प्रेरणा मिळेल.

रॉय यांनी सर्वात प्रथम 1964 मध्ये कॅलगेरी मॅरोथॉनमध्ये भाग घेतला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी 5 महाद्वीपांवरील 50 पेक्षा अधिक मॅरोथॉनमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी सर्वात जलद फिनलँडमधील हेलंसिकी येथील मॅरोथॉन पुर्ण केली होती. ही मॅरोथॉन केवळ 2 मिनिटे 38 सेंकदात त्यांनी पुर्ण केली होती.

या वर्षी अंटार्कटिका आइस मॅरोथॉनमध्ये 15 महिला आणि 41 पुरूषांनी सहभाग घेतला होता. सर्व स्पर्धकांना खाजगी विमानाने मॅरोथॉनच्या ठिकाणी आणण्यात आले.

Posted by Antarctic Ice Marathon on Sunday, December 15, 2019

अंटार्कटिक आइस मॅरोथॉनमध्ये बोस्टनच्या विल्यम हॅफर्टी यांनी 3 तास, 34 मिनिटे आणि 12 सेंकदात मॅरोथॉन पुर्ण करत पहिले स्थान मिळवले. चेक रिपब्लिकच्या लेंका फ्राइकोवा हे दुसऱ्या स्थानावर राहिले. महिलांमुळे कँब्रिजच्या 69 वर्षीय सुसान रेगन यांनी 7 मिनिटे, 38 मिनिट आणि 32 सेंकदात मॅरोथॉन पुर्ण करत पहिले स्थान पटकावले.

अंटार्कटिका मॅरोथॉन सर्वात उंच शिखर एल्स्वर्थ येथे -20 डिग्री सेल्सियस तापमानात आयोजित करण्यात येते.

Leave a Comment