सुझुकी हायाबुसाचे 2020 एडिशन भारतात लाँच

(Source)

मोटार सायकल कंपनी सुझुकीने हायाबुसाचे 2020 एडिशन लाँच केले आहे. ही बाईक मेटेलिक थंडर ग्रे आणि कँडी डेरिंग रेड या दोन रंगात उपलब्ध आहे. कंपनीने हायाबुसाच्या यंत्रात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. 1 एप्रिल 2020 पासून भारतात लागू होणाऱ्या बीएस6 कंम्प्लायंट मानकाच्या आधारावर ही बाईक नाही. यात बीएस4 इंजिन देण्यात आलेले आहे.

सुझुकी इंडियानुसार, 2020 हायाबुसा एडिशन मर्यादित संख्येत असेल. यामध्ये नवीन ग्राफिक्स आणि एक नवीन फ्रंट कॅलिपर मिळेल. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 13.75 लाख रुपये आहे.

(Source)

या बाईकच्या इंजिनमध्ये देखील कोणतेही बदल करण्यात आले नसून, यात 1340 सीसीचे इन-लाइन फोर सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे, जे 197 बीएचपी पॉवर आणि 155 एनएम टॉर्क जनरेट करते.

ही बाईक केवळ 2.74 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते. हायाबुसाची टॉप स्पीड ताशी 299 किमी आहे.

(Source)

2020 हायाबुसा भारतात विक्री होणारे शेवटचे मॉडेल आहे. यानंतर नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये बीएस6 इंजिन मिळेल. भारतात हायाबुसा कावासाकी निंजा ZX-14R ला टक्कर देईल. 20 जानेवारी 2020 पासून या बाईकची डिलिव्हरी सुरू होणार आहे.

Leave a Comment