१०० भाषा समजू शकणारा आणि फुटबॉल किक मारणारा रोबो तयार


इराणच्या तेहरान विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागाने गेल्या चार वर्षाच्या संशोधनातून एक अफलातून रोबो तयार केला आहे. सुरेना नावाचा हा रोबो चक्क १०० भाषा समजून घेऊ शकतो, बोलू शकतो आणि त्यांचा अनुवाद करू शकतो. सुरेना चेहरे ओळखतो आणि फुटबॉलला किक मारू शकतो.

हा रोबो १०० विविध प्रकारच्या वस्तू ओळखतो, वस्तू उचलू शकतो. हस्तांदोलन करून अभिवादन करतो आणि खडबडीत जमिनीवर मागे पुढे, डावी उजवीकडे व्यवस्थित तोल सांभाळून चालू शकतो. १७० सेंटीमीटर लांबीचा हा रोबो ७० किलो वजनाचा आहे आणि तो ताशी ७०० मीटर वेगाने चालू शकतो. त्याच्यात माणसाचे अनेक गुण आहेत असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment