क्रिकेटवेड्या भारतात वाढतेय फुटबॉलची क्रेझ


जगात क्रिकेटप्रेमी म्हणून ओळखले जाणारे जे देश आहेत त्यात भारताचे स्थान फारच वरचे आहे. क्रिकेटची क्रेझ भारतात नेहमीच वाढती असली तरी आता मात्र येथे फुटबॉलचे प्रेम वेगाने वाढत चालल्याचे दिसून आले आहे. ही क्रांती घडविण्याचे श्रेय जाते ते इंडियन सुपर लीग कडे. २०१४ मध्ये ही लीग सुरु झाली आणि युगव स्पोर्ट्स इंडेक्सच्या निरीक्षणानुसार २०१९ मध्ये देशातील ६४ टक्के युवा फुटबॉल मध्ये अधिक रस घेत असल्याचे दिसून आले. २०१३ मध्ये ही संख्या २७ टक्के होती.

इंडिअन सुपर लीग सुरु झाल्यापासून फुटबॉलच्या लोकप्रियतेत १२७ टक्के वाढ झाली असून आता भारतात क्रिकेट नंतर फुटबॉल हा दुसऱ्या क्रमांकाचा आवडता खेळ बनला आहे. शहरी भागात ३२.३ टक्के युवकाना फुटबॉल खेळाडू बनायचे आहे. २०१८ मध्ये इंडिअन सुपर लीगचे सामने टीव्हीवर २७ कोटी लोकांनी पहिले तर रशियन फिफा वर्ल्ड कप ११.१ कोटी लोकांनी पहिला होता. आयएसएलच्या सहाव्या सिझन मध्ये दर्शक संख्या १५.३६ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.

जगातल्या स्पेनच्या ला लीगा या उत्तम फुटबॉल क्लबने भारतात २०१६ मध्ये बेस बनविला असून ८ राज्यात १४ शहरात ३५ फुटबॉल क्लब मधून १० हजार उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे. फिफा अंडर १७ महिला वर्ल्ड कप भारतात आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे भारताच्या अनेक महान क्रिकेटपटूंनी इंडिअन सुपर लीगमध्ये गुंतवणूक केली असून त्यात सचिन, धोनी, विराट कोहली, सौरव गांगुली यांचा समावेश आहे.

Leave a Comment