अक्षयने पत्नी ट्विंकलला दिले कांद्याचे ईअरिंग्स


बॉलीवूड खिलाडी अभिनेता अक्षयकुमारची विनोदबुद्धी चांगलीच तल्लख असून लोकांना हसविणे त्याला मनापासून आवडते. त्याने पत्नी ट्विंकल हिच्यासाठी कांद्याचे ईअरिंग्स भेट म्हणून आणले आणि ते ट्विंकलला खुपच भावले. अर्थात हे ईअरिंग्स अक्षयने सराफ किंवा कोणत्याही शोरूम मधून नाही तर चक्क कपिल शर्मा याच्या शो मधून आणले असे समजते.

त्याचे झाले असे की अक्षयकुमार त्याच्या नव्या गुड न्यूज चित्रपटाच्या प्रमोशन साठी कपिल शर्माच्या शो मध्ये सहकलाकार करीना, कियारा अडवाणी, दिलजीत यांच्यासह गेला होता. तेव्हा करीनाला हे ईअरिंग्स भेट म्हणून दिले गेले मात्र तिला ते फारसे आवडले नाहीत म्हणून तिने त्याकडे लक्ष दिले नाही तेव्हा ते अक्षयने ट्विंकलसाठी आणले. ट्विंकलने देशात कांदा खुपच महाग झाल्याप्रकरणी नुकताच एक ब्लॉग शेअर करून त्यात विना कांदा बनविता येतील अश्या पाच रेसिपी शेअर केल्या होत्या.

अक्षयची ही अनोखी भेटवस्तू पाहून ट्विंकलने इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर केला आणि माझ्या जोडीदाराने कपिल शर्मा शो मधून परतताना करीना साठी असलेले ही ईअरिंग माझ्यासाठीं आणले आणि ते मला खूप आवडतील अशी खात्री असल्याचेही सांगितले. ट्विंकल म्हणते एखादी छोटीशी, हलकीफुलकी भेट खरोखर हृदयाला जाऊन कशी भिडते हे चांगलेच समजले. कांद्याचे ही ईअरिंग माझ्यासाठी बेस्ट प्रेझेंट आहेत.

Leave a Comment