बायकोला खूश करण्यासाठी त्याने 218 टन वजनी रेल्वे बनवला जागतिक विक्रम


व्लादिवोस्तॉक – 218 टन वजनी रेल्वे ओढून रशियातील 34 वर्षीय इवान सॅनिनने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. हा पराक्रम रशियात ह्यूमन माउंटेन नावाने चर्चित असणाऱ्या इवानने व्लादिवोस्तॉक शहरात गावजला. मागील एक वर्षापासून हे लक्ष्य गाठण्यासाठी तयारी करत असल्याचे इवानने सांगितले.

आपल्या पत्नीला प्रभावित करण्यासाठी इवाने ही रेल्वे खेचली. त्याचे पुढील लक्ष्य आता 12 हजार टन वजनी जहाज ओढण्याचे आहे. रशियन मीडियानुसार, यापूर्वीही जगात रेल्वे इंजिन, जहाज आणि विमानाला खेचले आहे, परंतु स्नायूंच्या सामर्थ्याने एवढ्या वजनाची रेल्वे खेचण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यापूर्वी 18 ऑक्टोबर 2003 रोजी मलेशियातील क्वालालंपूर रेल्वे स्थानकावर वेलु रथकृष्णनने आपल्या दातांनी 260.8 टन वजनी केटीएम रेल्वेला 4.2 मीटर (13 फूट 9 इंच)पर्यंत ओढण्याचा जागतिक विक्रम बनवला होता. तर भारतातील मध्यप्रदेशच्या विदिशा येथील रहिवासी ब्रह्मचारी आशीषने आपल्या दातांनी 65 टन वजनी रेल्वे इंजिन ओढले आहे. याशिवाय ग्वालियरच्या आरती आणि सविताने नॅरोगेज रेल्वेचे इंजिन ओढून लिम्का बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

Leave a Comment