नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला प्रशांत किशोर यांचा विरोध


नवी दिल्ली : आपल्या पदाचा संयुक्त जनता दलाचे नेते प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिला असून नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून निर्माण झालेल्या वादंगानंतर प्रशांत किशोर यांनी आपली भूमिका ठापमणे मांडली होती. या कायद्याला देशाच्या विविध भागातून विरोध होतो आहे. संयुक्त जनता दलाने आपल्या या पक्षाची पार्टी लाईन बाजूला ठेऊन विरोधी भूमिका घेतली. पण नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांचा राजीनामा स्विकारला नसल्याचे वृत्त आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जेडीयू नेता प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. प्रशांत किशोर यांनी या भेटीनंतर म्हटले की, आपल्याला नितीश कुमार यांनी विश्वास दिला आहे की, एनआरसी बिहारमध्ये लागू होणार नाही. प्रशांत किशोर यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत आपले मत कायम असल्याचे म्हटले आहे.

जनता दलाने (युनाइटेड) नागरिकत्व संशोधन विधेयकाला समर्थन दिल्यानंतर पक्षात नाराज असलेले जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी शनिवारी रात्री बिहारचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांची भेट घेतली होती. नागरिकत्व कायदा हा जर एनआरसीसोबत जोडला गेला तर भरपुर काय होईल. याला त्यांचा देखील विरोध आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, इतर नेत्यांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका. माझ्याकडून कोणताच विरोध नसल्याचे देखील प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

पक्षाचे नेते आर सी पी सिंह यांच्या वक्तव्यावर प्रशांत किशोर यांनी बोलण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले की, कोणावरही मी व्यक्तीगत टीका करणार नाही. जेडीयूचे राज्यसभेतील खासदार सिंह यांनी शुक्रवारी प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, किशोर यांची स्वत:ची कोणतीही जमीन नाही. पक्षासाठी त्यांनी आजपर्यंत काय केले. आजपर्यंत एकही सदस्य जोडला नाही.

Leave a Comment