जमैकाच्या टोनी सिंगने पटकावला मिस वर्ल्डचा खिताब


लंडन : मिस वर्ल्ड 2019 ची घोषणा शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली. लंडनमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात जमैकाच्या टोनी एन सिंग हीने मिस वर्ल्ड 2019 चा खिताब पटकावला. फ्रान्सची ओफिली मेजिनो यामध्ये उपविजेती ठरली तर तिसऱ्या स्थानावर भारताची सुमन राव राहिली.


120 देशांमधील स्पर्धकांना मागे टाकून टोनी एन सिंगने मिस वर्ल्डचा मुकुट जिंकला आहे. तिसऱ्या स्थानावर राहिलेली सुमन राव राजस्थानची असून तिने 2019 चा मिस इंडियाचा किताब जिंकला होता. याआधी अटलांटा येथे पार पडलेल्या 2019 च्या मिस यूनिव्हर्समध्ये दक्षिण अफ्रिकेच्या सौदर्यवतीने बाजी मारली होती. जोजिबिनी तुंजीने जगभरातील 90 सौंदर्यवतींना टक्कर देत मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता.

Leave a Comment