आजपासून फास्टॅग अनिवार्य


नवी दिल्ली – राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरुन जाणाऱ्या गाड्यांवर आजपासून फास्टॅग असणे अनिवार्य असणार आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासोबत प्रदूषण कमी करणे आणि लांब लचक वाहन्यांचा त्रास कमी करण्यासाठी हा उपक्रम केंद्र सरकारने सुरु केला आहे. पण तुमच्या गाडीवर जर फास्टॅग नसेल तर वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट टोलची रक्कम भरावी लागणार आहे. या दरम्यान चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग कुठून मिळणार आणि किती पैसे खर्च करावे लागणार या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

फास्टॅग हा एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनचा भाग असून टोल नाक्यावर तो उपलब्ध आहे. आरएफआयडीवर हे तंत्रज्ञान काम करते. वाहनाच्या पुढील बाजूला असलेल्या काचेवर हा टॅग लावावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी टोल नाक्याच्या येथून जाणार तेव्हा तुमच्या गाडीवर लावलेला फास्टॅग तेथे स्कॅन केला जाईल आणि अॅटोमॅटिक तुमच्याकडून टोलचे पैसे वसूल केले जाणार आहे. यासाठी वाहन जास्त वेळ टोल नाक्यावर थांबवावे लागणार नाही आहे. एकावेळेस घेतलेला फास्टॅग 5 वर्षांसाठी कायम राहणार आहे. पण चालकांना हा फास्टॅग वेळेनुसार रिचार्ज करावा लागणार आहे.

जर फास्टॅग तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तो वाहन खरेदी केलेल्या डीलकर कडून तुम्ही खरेदी करु शकता. त्याचसोबत खासगी बँकने सुद्धा फास्टॅग उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये अॅक्सिस बँक, आयडीएफसी बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक यांच्या कोणत्याही शाखेतून वाहनधारकांना फास्टॅग खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर फास्टॅग तुम्हाला पेटीएमच्या माध्यमातून सुद्धा विकत घेता येणार आहे.

तुम्हाला काही कागदपत्रे फास्टॅग खरेदी करण्यासाठी सादर करावे लागणार आहेत. वाहनधारकांना त्यामध्ये आरसी बुक, चालकाचा फोटो, केवायसी कागदपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी सुद्धा दाखवू शकता. हे कागदपत्र सादर केल्यानंतर तुमचे वाहन खासगी की व्यावसायिक कामासाठी आहे हे कळणार आहे. तर फास्टॅग खरेदी केल्याचे फायदे सुद्धा चालकांना होणार आहेत. त्यामध्ये टोलनाक्यावर टोल भरण्याचा वेळ वाचणार, लांबलचक वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच फास्टॅग असलेल्या धारकांना कॅशबॅक आणि अन्य ऑफर्स सुद्धा दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment