विन डिझेलसोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार दीपिका?


बॉलीवूडची मस्तानी म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची गणती सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. तिने बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नव्या वर्षांच्या पहिल्याच महिन्यात तिचा ‘छपाक’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांचेही लक्ष बॉलिवूडमध्ये राज्य गाजवत असलेल्या या सौंदर्यवतीने वेधून घेतले आहे. तिने ‘xxx : द रिर्टन ऑफ झेंडर केज’मध्ये काम केले होते. तिचा हा पहिलाच हॉलिवूडपट होता.


या चित्रपटानंतर दीपिकाच्या पदरात आणखी एक हॉलिवूडपट पडला आहे. कारण दीपिका याच चित्रपटाच्या पुढच्या भागात देखील दिसणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात ती चित्रपटाचा मुख्य हिरो विन डिझेल सोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. दरम्यान विन डिझेलने याचे संकेत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिले आहे. त्याने या पोस्टमध्ये ‘झेंडरकेज ४’ येणार याची पुसटशी कल्पना चाहत्यांना दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने दीपिकाच्या नावाचाही उल्लेख केला असल्यामुळे ‘झेंडरकेज ४’ मध्ये दीपिकाही दिसणार अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

Leave a Comment