वॉशरूम मध्ये जातानाही पुतीन यांच्यासोबत ६ बॉडीगार्ड


रशियाचे अध्यक्ष ७६ वर्षीय ब्लादिमीर पुतीन हे किती चाणाक्ष आणि सुरक्षेबाबत किती दक्ष असतात याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. स्वतः गुप्तहेर म्हणून आणि केजीबी प्रमुख म्हणून काम केलेले पुतीन यांचा सुरक्षेविषयीचा अभ्यास दांडगा आहे यात नवल नाहीच. पण आजही पुतीन यांची सुरक्षा किती कडेकोट आहे याचा पुरावा नुकताच मिळाला असून त्या संदर्भातील एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे.

पुतीन युक्रेन समिटसाठी पॅरीस येथे असून ते वॉशरूम मधून बाहेर पडत असल्याचा हा व्हिडीओ आहे. त्यात पुतीन बाहेर पडण्याच्या अगोदर पाच बॉडीगार्ड वॉशरूम मधून बाहेर पडताना दिसत आहेत तर पुतीन बाहेर आल्यावर आणखी एक बॉडीगार्ड बाहेर येताना दिसत आहे.

पॅरीसच्या एलसी पॅलेसमध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. युक्रेन समिटमध्ये चार देशांचे राष्ट्राध्यक्ष सामील झाले आहेत. त्यात रशियाचे पुतीन, फ्रांसचे मँक्रो, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलीदिमीर जलेन्स्की यांचा समावेश आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष कमी व्हावा यासाठी ही समिट आयोजित केली गेली असून यंदाच्या वर्षात या दोन्ही देशांनी एकमेकांचे बंधक मुक्त करण्यास संमती दिली आहे.

Leave a Comment