राणी एलिझाबेथच्या मृत्यूचा १० देशांवर पडणार प्रचंड आर्थिक बोजा


जगात आजही अनेक देशात राजेशाही अस्तित्वात आहेत मात्र त्यात सर्वाधिक पॉवरफुल राजघराणे आहे ब्रिटनचे. ब्रिटनची राणी आणि राज्यपरिवाराला मोठा मान आहे. त्यामुळे या राजघराण्यातील कुणीही सदस्य मृत्यू पावला तर त्यांचा अंत्यविधी शाही रिवाजानुसार होतो आणि त्यासाठी प्रचंड मोठा खर्च केला जातो. नुकत्याच एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ब्रिटनची राणी एलिझाबेथ दोन हिचा मृत्यू ओढवला तर ब्रिटन बरोबरच अन्य दहा देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकेल. राणी सध्या ९३ वर्षाची आहे आणि तिची तब्येत अजूनही उत्तम आहे.

राणी एलिझाबेथ द्वितीय गेली ६७ वर्षे ब्रिटनच्या सिंहासनावर आहे. १९५३ मध्ये राणीने राजमुकुट धारण केला होता. आणि राणीचा मृत्यू ही या शतकातील मोठी घटना असेल. राणीच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च ब्रिटीश सरकारला करावा लागतो. या पूर्वी राजघराण्यातील प्रिन्सेस डायना हिचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या अंत्यसंस्कारावर १० दशलक्ष डॉलर्स खर्च आला होता. राणी नंतर ब्रिटनला नवा राजा मिळेल. त्यावेळी ब्रिटनची सर्व करन्सी नव्याने छापावी लागेल असे समजते. सध्या ब्रिटन करन्सीवर राणी एलिझाबेथ दोनची प्रतिमा आहे त्याऐवजी नव्या राजाची प्रतिमा येईल. सध्या ब्रिटनच्या बाजारात ३.६ अब्ज पेक्षा अधिक करन्सी वापरत आहे. ती नव्याने बदलून घेण्यासाठी २०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे १४१४ कोटी रुपये लागतील.

राणीचे अंत्यसंस्कार आणि नव्या राजाच्या राज्याभिषेक हे दोन मोठे समारंभ असल्याने त्यादिवशी राष्ट्रीय सुटी दिली जाते. ब्रिटन मध्ये एका राष्ट्रीय सुट्टीमुळे ३ अब्ज डॉलरचे नुकसान होते असे सांगितले जाते. याचाच अर्थ दोन सुट्ट्या म्हणजे ६ अब्ज डॉलर्स नुकसान. याचबरोबर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जमैका, मॉरिशस, केमेन, आयलंड, सेंट हेलेना, इरले ऑफ मॅन, जर्सी, जिब्राल्टर या देशांनाही त्यांची करन्सी बदलावी लागेल आणि त्यासाठी १ अब्ज डॉलर्स म्हणजे ७ हजार कोटी खर्च येईल. याचाच सरळ अर्थ असा की राणीचा मृत्यू झालाच तर ८ अब्ज डॉलर्स म्हणजे साधारण ५६ हजार कोटींचा बोजा जगातील या देशांवर पडणार आहे.

Leave a Comment