व्हॉल्वोची पेट्रोल इंजिनवाली 40 लाखांची एसयूव्ही लाँच

(Source)

व्हॉल्वोने भारतीय बाजारात XC40 T4 R-Design पेट्रोल व्हेरिएंट लाँच केले आहे. या शानदार एसयूव्हीची किंमत 39.9 लाख रुपये आहे. यामध्ये बीएस-6 पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. स्मॉल प्रिमियम एसयूव्ही सेग्मेंटमध्ये व्हॉल्वोची ही पहिलीच पेट्रोल कार आहे. XC40 कार आतापर्यंत भारतात केवळ डिझेल पर्यायामध्ये उपलब्ध होती.

(Source)

XC40 T4 R-Design मध्ये बीएस-6 कंम्प्लांयट, 2.0 लीटर, 4 सिलेंडर, टर्बो डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 190एचपी पॉवर आणि 300एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 8-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्सनी सुसज्ज आहे. पेट्रोल इंजिन एसयूव्ही फ्रंट व्हिल ड्राइव्ह सपोर्ट करते, तर डिझेल इंजिन कार ऑल-व्हिल ड्राइव्ह सपोर्ट करते.

(Source)

पेट्रोल इंजिन XC40 केवळ R-Design या एकाच व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये पॅनोरमिक सनरूफ, स्मार्टफोन्ससाठी वायरलेस चार्जिंग, अँड्राईड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टसोबत 9 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम, 12.3 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 14 स्पीकर हार्मन कार्डन साउंड सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, फ्रंट आणि रिअर पार्क असिस्ट पायलट, डायमंड कट अलॉय व्हिल्ज आणि पॉवर्ड टेलगेट सारखे फीचर्स आहेत.

(Source)

भारतीय बाजारात व्हॉल्वो XC40 T4 R-Design एसयूव्हीची टक्कर बीएमडब्ल्यू एक्स1, मर्सिडिज बेंझ GLA (GLA 200), ऑडी Q3 (30TFSI) आणि मिनी कंट्रीमॅन (Cooper S) या गाड्यांशी होईल.

Leave a Comment