आम्हाला सोडून गेलेल्या भिकारड्यांना ह्याऊन मोठी शिक्षा मिळू शकत नाही


मुंबई – माजी खासदार आणि नारायण यांचे पुत्र निलेश राणेंनी शिवसेनेचा आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव झाला असून भाजपचे लॉरेन्स मान्येकर या निवडणुकीत १ हजार ९७९ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या जान्हवी सावंत यांचा पराभव केल्याचे म्हणत सतिश सावंत यांच्यावर निशाणा साधला.

आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा सतीश सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. नितेश राणे यांच्या विरोधात सतिश सावंत यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. नितेश राणेंनी यामध्ये त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

ज्या सतीश सावंतच्या आमदारकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आले होते, त्यांच्याच गटाचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. आम्हाला सोडून गेलेल्या भिकारड्यांना यापेक्षा मोठी शिक्षा मिळू शकत नसल्याचे म्हणत निलेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

Leave a Comment