… म्हणून आईच्या वेषात मुलगा ड्रायव्हिंग टेस्टसाठी गेला, झाली अटक

(Source)

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ड्रायव्हिंगची टेस्ट देणे आवश्यक असते. मात्र अनेकजण या टेस्टमध्ये नापास झाल्याने लायसेन्स मिळत नाही. ब्राझीलमधील एक छोटेसे शहर नोवो मुतूम पराना येथील 60 वर्षीय डोना मारिया या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये तब्बल 3 वेळा नापास झाल्या. आई 3 वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास झाल्याने मुलगा हेक्टर मर्सियो शियाव हा चक्क आईसारखी वेशभूषा करून ड्रायव्हिंग टेस्टसाठी पोहचला. मात्र येथे त्याची पित्तळ उघडले पडले व त्याला अटक करण्यात आले.

आईने चौथ्यांदा टेस्ट देण्यास नकार दिल्याने हेक्टरने आईसारखा वेष करून आणि टेस्ट देण्यासाठी पोहचला. मात्र आवाज आणि मोठे हात यामुळे अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला.

ड्रायव्हिंग टेस्टच्या वेळी हेक्टर 2 तास उशिरा पोहचला. तोपर्यंत सर्व उमदेवारांनी टेस्ट दिली होती. टेस्ट अधिकारी एलिन मेंडोका यांनी सांगितले की, जे मी बघत होते, त्यावर विश्वास बसत नव्हता. एक व्यक्ती महिलेप्रमाणे लांब स्कर्ट आणि फ्लोरेल टॉप घातलेला होता. त्याने हँडबॅग देखील पकडली होती. एवढेच नाही तर त्याने नखांना देखील पेंट केले होते.

हेक्टरवर संशय आल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे आयडी मागितल्यावर या प्रकरणाचा खुलासा झाला व त्याला अटक करण्यात आली.

Leave a Comment