ब्रिटिश राजघराण्यात नोकरीची संधी, तुम्हीही करू शकता अर्ज

(Source)

जर तुम्हाला सोशल मीडियाचा अनुभव असेल, तर तुमच्यासाठी एक खास नोकरी आहे. ती देखील अशी साधीसूधी नोकरी नाही तर थेट ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांच्या येथे तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळेल.

रॉयल हाउसहोल्डने लिंक्डइनवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांना राणी एलिजाबेथ यांची सोशल मीडियावरील उपस्थिती दर्शवण्यासाठी डिजिटल इंग्जेमेंट प्रमुखाची (Social Media Director) गरज आहे.

लिंक्डइनवर पोस्ट केलेल्या या नोकरीमध्ये रॉयल हाउसहोल्डने स्पष्ट केले आहे की, रॉयल कुटूंबाचे काम आणि त्यांची समाजातील उपस्थिती ही सोशल मीडियाद्वारे जगभरातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम असेल. याचबरोबर एका छोट्या टीमबरोबर मिळून रॉयल फॅमिलीचे सोशल मीडियावरील उपस्थिती वाढवण्याचे काम करावे लागेल.

ब्रिटिश राजघराण्याचे इंस्टाग्रामवर 6.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.

निवड झालेल्या उमेदवाराला वर्षाला 45 ते 50 हजार पाउंड्स ( जवळपास 47 लाख रुपये) पगार मिळेल. आठवड्याते 5 दिवस (सोमवार ते शुक्रवार) आणि 37.5 तासच काम करावे लागेल.

या नोकरीसाठी तुम्ही देखील 24 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकता. निवड झालेल्या उमेदवारांची जानेवारी 2020 मध्ये मुलाखत घेण्यात येईल.

 

Leave a Comment