भारतात दाखल झाली पोर्शेची 1.31 कोटींची शानदार एसयूव्ही

(Source)

लग्झरी कार कंपनी पोर्शेने कयानी कूपे 2020 एडिशन भारतात लाँच केले आहे. एरोडायमिक डिझाईन असणारी ही एसयूव्ही आधीच्या तुलनेत अधिक स्पोर्टी आहे.

भारतात ही एसयूव्ही व्ही6 आणि टर्बो या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या एसयूव्हीची किंमत 1.31 कोटी ते 1.97 कोटी रुपयांपर्यंत आहे. या एसयूव्हीची संपुर्ण बिल्ट यूनिटमध्ये भारतात विक्री केली जाईल. याच्या टर्बो इंजिनचा टॉप स्पीड ताशी 286 किमी आहे.

(Source)

कायनीच्या व्ही6 कूपे व्हेरिएंटमध्ये 3 लीटर व्ही6 इंजिन आहे. जे 340 पीएस पॉवर आणि 450 एनएम टार्क जनरेट करते. ही कार केवळ 5.7 सेंकदात ताशी 100 किमीचा वेग पकडते. याचा टॉप स्पीड ताशी 243 किमी आहे.

याच्या टर्बो व्हेरिएंटमध्ये 4 लीटर टर्बो ट्रिन टर्बोचार्ज्ड व्ही8 पेट्रोल इंजिन आहे. ते 550 पीएस पॉवर आणि 770 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 8-स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशन मिळेल.

(Source)

इंटेरिअरबद्दल सांगायचे तर यात डॅशबोर्डवर 12.3 इंचचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. एसी आणि ऑडिओ कंट्रोलसाठी टच बटन देण्यात आले आहे. याच्या इंटेरिअरमध्ये ऑल-ब्लॅक थीम मिळेल. याशिवाय थ्री-स्पोक स्टेअरिंग व्हिल मिळेल.

कूपेमध्ये ऑटो एलईडी हेडलँम्प, फोर झोन क्लाइमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, 18-वे एडजस्टेबल फ्रंट सीट्स, रिअर कॅमेरा, फ्रंट-रिअर पार्किंस सेंसर सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

(Source)

याशिवाय स्टँडर्ड सेफ्टी फीचर्समध्ये 8 एअरबॅग्स, Isofix चाइल्ज सीट माउंट, एबीएस-ईबीडी, ब्रेक असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट आणि हील डिसेंट असिस्ट सारखे फीचर्स मिळतील.

Leave a Comment