लग्नात वर-वधूने घातली चक्क कांदा-लसणाची वरमाळा

(Source)

कांद्याचे भाव एवढे वाढले आहेत की, आता लोक कांद्याशिवाय भाज्या बनवत आहेत. वाराणसीमधील एक वर-वधुने तर त्याच्या पुढील टप्पा गाठला आहे. वाराणसीतील एका वर-वधुने लग्नाच्या दिवशी एकमेंकाना चक्क फुलांच्या जागी कांदा आणि लसूणची वरमाळा घातली. लग्नात आलेल्या पाहुण्यांनी देखील या नवदांपत्यांना भेट म्हणून लसूण आणि कांद्य टोपली भरून दिले.

कांद्याच्या किंमती वाढल्यामुळे लोक वेगवेगळ्या पद्धती शोधून त्याद्वारे विरोध दर्शवत आहेत. या लग्नात देखील वर-वधुने या वरमाळेचा वापर विरोध म्हणूनच केला.

वाराणसीत सध्या कांद्याची किंमत 120 रुपये प्रती किलो आहे. बंगळुरू, मुंबई या ठिकाणी कांद्याच्या किंमती 150-200 रुपये किलो आहे. नवदांपत्यांचे हे कृत्य चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी काही दिवसांपुर्वी अशाप्रकारेच तामिळनाडूतील एका जोडप्याला लग्नात 2.5 किलो कांदे भेट देण्यात आले होते.

 

Leave a Comment