मारूती सुझुकी लवकरच सादर करणार नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही

(Source)

मारूती सुझूकी लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात आणणार आहे. कंपनीने यासाठी एक ट्रेडमार्क एप्लिकेशन दाखल केले आहे, लीक झालेल्या ट्रेडमार्क एप्लिकेशनद्वारे या एसयूव्हीबद्दल माहिती समोर आली आहे. मारूती आपल्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या कॉन्सेप्टला फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये सादर करू शकते. या कॉन्सेप्ट एसयूव्हीला Futuro-E नाव देण्यात आलेले आहे.

या एसयूव्हीबद्दल अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ही एसयूव्ही काही दिवसांपुर्वीच लाँच झालेली मायक्रो एसयूव्ही एस-प्रेसोचे इलेक्ट्रिक व्हर्जन नसेल. या एसयूव्हीला कंपनीच्या फ्यूचर एसयूव्हीच्या रूपात प्रदर्शित केले जाईल. या एसयूव्हीचे अंतिम उत्पादन व्हर्जन केवळ इलेक्ट्रिक असण्याची शक्यता कमी आहे.

ऑटो एक्सपो 2020 मध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करून भविष्यातील मार्केटमध्ये स्वतःच्या स्थान निर्माण करत आहे.

दरम्यान, मारुती सुझूकी अनेक दिवसांपासून देशभरात इलेक्ट्रिक वॅग्नआरची टेस्टिंग करत आहे. ही इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 200 किमी चालेल. या कारची किंमत जवळपास 12 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment