कर्मचाऱ्यानेच चोरले बँकेतून 62 लाख रुपये आणि काय केले पहाच

(Source)

ज्या व्यक्तीला बँकेतील कॅशरूमला सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्याच व्यक्तीवर तब्बल 62 लाख रुपये चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथे घडली आहे. वेल्स फार्गो बँकेने एका व्यक्तीवर लाखो रुपयांच्या चोरीचा आरोप केला आहे.

29 वर्षीय अर्लान्डो हेन्डरसनवर आरोप आहे की, त्याने आधी चोरी लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर सोशल मीडियावर आपल्या लग्झरी लाइफ आणि कॅशचे फोटो शेअर केले. हेन्डरसनने सोशल मीडियावर महागडे कपडे, ज्वेलरी आणि बिल्स शेअर केले.

(Source)

काही फोटोंमध्ये तर हेन्डरसन नोटांचे बंडल घेऊन दिसत आहे. चारलोट्टेच्या फेडरल कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मागील आठवड्यातच सॅन डिआगो येथून त्याला अटक करण्यात आले होते.

(Source)

हेन्डरसनवर चोरी, फसवणूकसह 34 आरोप लावण्यात आले आहेत. त्याने एप्रिल 2019 मध्ये बँकेत नोकरी मिळाल्यानंतर जवळपास 18 वेळा बँकेतून रोख रक्कम जमा केली. हे पैसे ग्राहकांनी बँकेत जमा केले होते.

(Source)

सुरूवातीला त्यानी छोटी रक्कम चोरी केली. मात्र कोणालाच माहिती पडत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने मोठी रक्कम चोरी केली. या पैशांनी त्याने महागडे कपडे, दागिने आणि मर्सिडिज कार खरेदी केली.

Leave a Comment