आता व्हेजिटेबल ऑईलने डिझेल जनरेटर चालवणे शक्य

(Source)

राजस्थानच्या जयपूर येथील एमएनआयटीच्या प्रोफेसरनी एक नवीन तंत्रज्ञान शोधले आहे. याद्वारे व्हेजीटेबल ऑईलद्वारे डिझेल जनरेटर चालवले जाऊ शकते. प्रोफेसर्सनी सर्व डिझेल इंजिन बाईक चालवण्यावर रिसर्च केला होता. मात्र याचे पेटंट 10 वर्षांनंतर मिळाले आहे. सध्या डिझेल बाईक चालत नाही, त्यामुळे याचा वापर डिझेलवर चालणाऱ्या इंजिन आणि जनरेटरमध्ये केला जाईल. प्रोफेसर्सचा दावा आहे की, हे डिझेलच्या तुलनेत 30 टक्के स्वस्त आहे. यामुळे इंजिनवर देखील काहीही परिणाम होणार नाही व धुरामुळे कार्बन फुटप्रिंट देखील वाढणार नाही.

एमएनआयची मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे हेड प्रोफेसर दिलीप शर्मा आणि एनआयटी उत्तराखंड डायरेक्टर प्रो. एसएल सोनी, कमल खत्री आणि त्यांच्या टीमने 2009 मध्ये याच्या पेटंटसाठी अर्ज केला होता.

असा केला प्रयोग –

बाईकमध्ये डिझेल टँकजवळ आणखी एक टँक लावण्यात आला. ज्यात व्हेजिटेबल ऑइल टाकण्यात आले. दोन्ही टँकच्या पाइपजवळ फ्यूल चेंजर लावण्यात आले. बाईकच्या सायलेंन्सरमध्ये हीट एक्सचेंजर लावण्यात आले. बाईकला डिझेल मोडवर चालू करण्यात येत व फ्यूल चेंजरद्वारे व्हेजिटेबल ऑईलने बाईक चालते.

या ऑईलला चेंजरद्वारे सायलेंन्सरपर्यंत पोहचवले जाते. सायलेन्सरद्वारे तेल गरम होऊन इंजिनपर्यंत पोहचते. या सर्व गोष्टीसाठी 1500 रुपये खर्च आला.

एमएनआयटीचे प्रोफेसर दिलीप शर्मा म्हणाले की, शेती अथवा दुसऱ्या जागेवर डिझेल इंजिनमध्ये ही टेक्नोलॉजी फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांना या टेक्नोलॉजीवर काम करण्यासाठी आम्ही निशुल्क मदत करू.

Leave a Comment