‘वर्षा नाइट क्लब’मध्येच रचला गेला भाजप नेत्यांच्या पराभवाचा डाव


मुंबई – वर्षा नाईट क्लबमध्येच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लोकनेत्यांना पराभूत करण्याचा डाव रचण्यात आला होता असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. फडणवीस आणि त्यांच्या अतिशय जवळच्या नेत्यांना ‘वर्षा बंगला नाइट क्लब गँग’ असे त्यांनी म्हटले आहे. हीच गँग विधानसभा निवडणुकी लोकनेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव आणि एकनाथ खडसे यांच्या नाराजीला जबाबदार असल्याचे गोटे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्षा निवासस्थान प्रत्यक्षात नाइट क्लब गँग होती. षडयंत्र याच ठिकाणी रचले जात होते. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेण्यासाठी भाजपची राज्यात सत्ता असताना मंत्री राहिलेले गिरीश महाजन यांच्यासह इतर नेते येथे येत होते. लोकनेत्यांना पराभूत करण्याचे डाव त्याच भेटींमध्ये रचले जात होते. भाजपच्या एखाद्या लोकप्रिय नेत्याला पराभूत करण्यासाठी त्यांच्याच भागातील विरोधी पक्षाच्या नेत्याला कसे मजबूत करता येईल यावर चर्चा केल्या जायच्या.

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांच्यासह महत्वाच्या नेत्यांना फडणवीस यांच्या वर्षा गँगने बाजूला सारले. तसेच गँगचे मेंबर असलेल्या गिरीश महाजन, जयकुमार रावल, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, राम कदम आणि इतरांना मोठे केले. नेहमीच 10 वाजता वर्षा बंगल्यावर त्यांच्या बैठका व्हायच्या. मी पण त्याचाच बळी ठरलो. मी याच कटकारस्थानांना कंटाळून भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा गोटे यांनी केला.

Leave a Comment