गुगलच्या या फिचरमुळे होणार स्पॅम मेसेजपासून सुटका

(Source)

गुगल आपल्या मेसेंजर अर्थात गुगल मेसेजसाठी लवकरच आतापर्यंतच सर्वात मोठे फीचर जारी करणार आहे. नवीन अपडेटनंतर गुगल मेसेजमध्ये व्हेरिफाइड मेसेज आणि स्पॅम प्रोटेक्शन फीचर मिळेल. गुगल मेसेज हे सर्व अँड्राईड फोनमध्ये डिफॉल्ट स्वरूपात असते.

नवीन अपडेटनंतर जर तुम्हा कोणताही मेसेज आला तर तो व्हेरिफाइड नंबर वरूनच येईल. त्यामुळे खरा नंबर व फेक नंबर कोणता हे तुम्हाला त्वरित समजेल. उदाहरणार्थ, जर बँकेकडून तुम्हाला एखादा मेसेज आला तर तो व्हेरिफाइड असेल. व्हेरिफाइड नंबर सोबत त्या कंपनीचा लोगो आणि व्हेरिफिकेशन टिकमार्क असेल.

गुगल मेसेजमध्ये व्हेरिफिकेशन एसएमएसचे फीचर सर्वात प्रथम भारत, अमेरिका, मॅक्सिको, ब्राझील, ब्रिटने, फ्रान्स, फिलिपिंस, स्पेन आणि कॅनडामध्ये लाँच होईल. हे फीचर कधी रोल आउट होईल याबाबतची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

व्हेरिफाइड मेसेज व्यतरिक्त गुगल मेसेजमध्ये स्पॅम प्रोटेक्शन फीचर देखील मिळेल. या फीचरनंतर जर तुम्हाला कोणत्याही नंबरवरून स्पॅम मेसेज आल्यास गुगल तुम्हाला अलर्ट करेल. स्पॅम मेसेज आल्यावर तुम्हाला report not spam आणि report spam असा पर्याय दिसेल.

Leave a Comment