महिला स्टेशनवर विसरली पैशांची बॅग, जवानाने काय केले बघाच

(Source)

दररोज लाखो प्रवासी दिल्ली मेट्रोमधून प्रवास करतात. अशावेळी काही प्रवासी एवढे घाईत असतात की, आपले सामान देखील मेट्रो स्टेशन अथवा मेट्रोच्या आत विसरतात. अशीच एक घटना महिलेसोबत घडली. ही महिला सुरक्षा तपासात एक्सरे मशीनमधून स्वतःची बॅग घेण्यासच विसरली.

जेव्हा सीआयएसएफ जवानाने या बॅकेची तपासणी केली, तेव्हा त्यात 58 हजार रुपये असल्याचे समोर आले. त्यानंतर जवानाने आपल्या कर्तव्य बजावत बॅगच्या मालकाचा शोध घेत त्या महिलेला बॅग परत दिली.

रिपोर्टनुसार, ही घटना ग्रीन पार्क मेट्रो स्टेशन येथे घडली. येथे कांता नावाची एक महिला बॅग X-BIGS (एक्स-रे बॅगेज इंस्पेक्शन सिस्टम) मध्ये टाकल्यानंतर तेथून घ्यायलाच विसरली. त्यानंतर सीआयएसएफच्या जवानाने बॅकेच्या खऱ्या मालकाला शोधले व त्यांना नोटांनी भरलेली बॅग परत केली.

Leave a Comment