आसाम, त्रिपुरामधील परिस्थितीबाबत लष्कराने जारी केली अॅडव्हायजरी


नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात ईशान्य भारतामधील विविध ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. लष्कर आसाम, त्रिपुरामध्ये तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी भारतीय लष्कराकडून या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर ईशान्य भारतासंबंधी पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीपासून नागरिकांनी सतर्क रहावे, अशी सुचना करणारी अॅडव्हायजरी जारी केली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ईशान्य भारतामध्ये लागू झाल्यामुळे सोशल मीडियावर संशयास्पद व्यक्तीकडून खोटे संदेश आणि अफवा पसरवण्यात येत आहेत. नागरिकांनी या अफवांवर विश्वास न ठेवता खोट्या माहितीपासून सतर्क रहावे, अशी अॅडव्हायजरी लष्कराने जारी केली आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आसाममधील गुवाहाटीमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. कोणत्याच अफवा ईशान्य भारतामधील परिस्थितीविषयी पसरवल्या जाऊ नये, यासाठी सोशल मीडियावरील संदेशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. खोटे संदेश आणि अफवा पसरू नये, यासाठी लष्कराने सावधगिरी बाळगली आहे.

Leave a Comment